Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीने केली हत्या!
    गुन्हे वार्ता

    आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीने केली हत्या!

    रावेर तालुक्यातील निमड्या येथील घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2026No Comments507 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याच्या रागातून एका नराधम पतीने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील निमशेत (सायबूपाडा) येथे घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

    लालू शरद पावरा (वय 25, रा. निमड्या, ता. रावेर) असे मयत महिलेचे नाव आहे. दि. 4 एप्रिल रोजी सायंकाळी 3 ते 5 वाजेच्या सुमारास आरोपी पती शरद मिरलाल पावरा याने राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जंगलात पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, लालू पावरा ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तिने त्रासामुळे पतीला नकार दिला. या नकाराचा राग आल्याने शरद पावरा याने तिला जमिनीवर पाडून तिचे हात-पाय दाबले आणि छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळून तिची हत्या केली. एवढेच नव्हे तर, तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

    याप्रकरणी पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (वय 37, रा. अंधारमळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर विभाग) अनिल बडगुजर, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आज दि. 13 एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग, अतिरिक्त प्रभार फैजपूर) अण्णासाहेब घोलप यांनीही भेट दिली आहे.

    गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला दि. 13 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत. जंगलात घडलेल्या या क्रूर घटनेमुळे संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून, गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif