पतीने पत्नीला गाडीखाली दाबले!

भडगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

0

सागर महाजन

भडगाव :  राज्यात महिला छळाच्या घटनांच्या उच्छांद मांडला असून मेो सिटीमधील हे लोण ग्रामीण भागात पोहचले असून भडगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन पती-पत्नीत वाद झाल्याने पतीने पत्नीला थेट गाडीखाली दाबले असून यात महिला गंभीर जखमी झालेली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पेठ भागातील माहेर असलेल्या 32 वर्षीय विवाहिता व पती यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक भांडण झाल्याने पाचोरा येथील पतीने पत्नीच्या अंगावर थेट टाटा नेक्सोन गाडी चालवत ती गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन ठार करण्याच्या उद्देशाने गाडीखाली चिरडत फरफटत नेले. या गंभीर प्रकारामुळे 32 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून त्या महिलेच्या संपूर्ण शरीरावर मोठ्या जखमा झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या अंगावर काटा येर्इल अशी ही घटना सर्वांना थक्क करीत आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अधिक माहिती अशी की, तृप्ती रेवण पवार (वय-32) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी रेवण प्रमोद पवार (रा. पाचोरा) याने फिर्यादीची बहिण प्रियदर्शनी पाटील यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. पत्नीला सांगितले की, तु येऊ नको मी मुलीला घेऊन चाललो.
असे म्हणत पत्नीने पतीला समजावून सांगितले की, आम्ही दोघे उद्या सकाळी येतो असे सांगण्याचा पतीला राग आल्याने त्याने त्यांची मुलगी गार्गीला घेऊन जाण्यास जोरजबरदस्ती ओढतान करुन फिर्यादीची आई, बहिण हे मुलगी घेण्यासाठी जवळ आले असता आरोपीने संतापात त्याची गाडी टाटा नेक्सोंन गाडीत बसून गाडी चालू करुन पत्नीच्या अंगावर गाडी चालविली. यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचार सुरु आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.