Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»नवरा बायकोत वाद : थेट पेट्रोल टाकून जाळले
    महाराष्ट्र

    नवरा बायकोत वाद : थेट पेट्रोल टाकून जाळले

    लग्नानंतर तीनच महिन्यात पतीचे भयंकर कृत्य
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2026No Comments653 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एक अत्यंत भयानक प्रकार घडला. लग्नाला दोन तीन महिनेच झाले होते. त्यातच दोघांच्या कुरबुरी वाढल्या. त्या इतक्या टोकाला गेल्या की संतप्त नवऱ्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही याच घटनेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

    सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरातील ही घटना आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. फैजान जावेद शेख असं आरोपी पतीचे नाव आहे. तर नर्गिस शेख असे पीडीत पत्नीचे नाव आहे. सुदैवाने ही महिला वाचली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ती गंभीर भाजली आहे.

    2024 साली नर्गिस आणि फैजान या दोघांचा विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही वेगळे राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सातत्याने वाद होत होते. काल बुधवारी रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरी आला आणि पत्नी सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत नेले. तिथे दोघांमध्ये परत वाद झाला. त्यानंतर संतप्त आरोपीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला लायटरने पेटवून देऊन फरार झाला.

    घरात आग लागल्याचे पाहून शेजारी धावत आले. त्यातच नर्गिसच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक धावत सुटले. शेजाऱ्यांना नर्गिसच जळत असल्याचे दिसली. त्यानंतर शेजारी आणि कुटुंबीयांना तात्काळ आग विझवली आणि कुटुंबियांनी नर्गिसला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. नर्गिसचीही जबानी घेतली जाणार आहे.

    दरम्यान, आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने हा प्रकार का केला? दोघांमध्ये शेवटचा वाद कशावरून झाला? तो एकटाच होता की आणखी कोणी त्याच्यासोबत होते? आदी प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असून पोलीस या प्रश्नांचा शोध घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif