चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरुद्ध असलेल्या विविध तक्रारी व अवैध गौण खनिजाकडे कानाडोळा करण्यात आल्याचा प्रकार यासाठी त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मुख्य मागणीसाठी दि.29 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततेत जनआंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाला जात अमळनेर येथील प्रांत अधिकारी यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी पाठविलेले कार्यालयाचे प्रतिनिधी नायब तहसीलदार श्री.जोशी यांना मागणींचे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी सदर निवेदनातील मागण्या या शासनाकडे तात्काळ पाठवल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी गोपाळराव सोनवणे, बाळासाहेब पाटील, शशिकांत देवरे, अमृतराव वाघ, मगन बाविस्कर, दीपक सोनवणे, शुभम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. या मनोगतातून चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाचा सुर उमटला.
शेकडोच्या संख्येने निघालेल्या या जन आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका संध्या महाजन, चोसाकाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, कृउबा समितीचे माजी सभापती नारायण पाटील, मनसे नेते अनिल वानखेडे, भाजपाचे प्रदीप पाटील, मगन बाविस्कर, रवींद्र मराठे, शिवसेना (उबाठा)चे सुनील बडगुजर, शशिकांत कन्हैये, चुंचाळेचे माजी पं. स.सदस्य नंदलाल चौधरी, तापी सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, शशिकांत देवरे, संजय कानडे, अजय पालीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत धनगर, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष किशोर दुसाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल राजपूत, शहराध्यक्ष समाधान पाटील, मनसेचे निलेश बारी, विकी सिंधी, तुकाराम पाटील, प्रल्हाद पाटील, शामकांत परदेशी, उर्वेश साळुंखे, प्रफुल्ल स्वामी, मुन्ना शर्मा, तुळशीराम पाटील, भाजपा नगरसेवक डॉ. रोहन पाटील, गटनेता गजेंद्र जयस्वाल, गिरीश देशमुख, रणजीत देशमुख, लहूश धनगर, सुनील सोनगिरी आदी उपस्थित होते.


