क्रिकेटपटू शुभमन गिल त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

शुभमन गिल (Shubman Gill) ‘सारा’ मुळे चर्चेत आला आहे. बऱ्याच दिवसांपासून असं म्हंटले जात आहे कि तो ‘सारा’ ला डेट करत आहे. पण ती ‘तेंडुलकर’ आहे कि ‘खान’ यात मात्र तफावत आहे. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल सध्या त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. शुभमन गिल सारासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण ही सारा, सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आहे की सारा अली खान (Sara Ali Khan) याबाबत चाहते संभ्रमात आहेत. दरम्यान शुभमनने व्हॅलेंटाइन डेला स्वतःचा एक फोटो शेअर केला. हा फोटो लंडनमधील एका कॅफेचा आहे, असे म्हटले जात आहे. पण आता या फोटोवरुन पुन्हा एकदा नेटकरी शुभमनला सारावरुन चिडवत आहेत. त्याचे कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिनेदेखील काही दिवसांपू्र्वीच याच कॅफेतील फोटो शेअर केला होता. नेटकऱ्यांनी साराचा हा जुना फोटो शोधून त्याचे कनेक्शन शुभमनच्या फोटोशी जोडले आहे.

साराचा जुना फोटो आला समोर

शुभमनच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपला मोर्चा सारा तेंडुलकरच्या त्या जुन्या फोटोकडे वळवला. जुलै 2021 मध्ये पोस्ट करण्यात आलेल्या फोटोवर काही तासांपूर्वी अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.