Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»प्रतीक्षा संपली ! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..
    महाराष्ट्र

    प्रतीक्षा संपली ! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर..

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 7, 2022Updated:June 7, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालकधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

    मिळलेल्या माहितीनुसार १२ वी चा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी ८ जूनला लागणार आहे.  दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo

    — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022

    या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.. 

    http://mahresult.nic.in

    mahahsscboard.in

    http://hscresult.mkcl.org

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती.

    बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    HSC Exam Result News HSC Result 2022 Date Maharashtra Board
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif