Monday, August 15, 2022

पंडित हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयनाथ यांचे पुत्र गायक आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला त्यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर सोहळ्याला उपस्थित नव्हते. डॉक्टरांच्या देखरेखीत हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयनाथ यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली तर दोन आठवड्यांच्या आत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल; अशी माहिती आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.

प्रत्येक वेळेस मंगेशकर कुटुंबाने आयोजित केलेल्या सोहळ्यात मान्यवरांचे स्वागत हृदयनाथ मंगेशकर करतात. यानंतर मंगेशकर कुटुंबाच्या ट्रस्टची माहिती देणे आणि कार्यक्रमाची रुपरेखा थोडक्यात सांगणे हे काम हृदयनाथ मंगेशकर करतात. पण यावेळी ही जबाबदारी मी पार पाडत आहे असे सांगत आदिनाथ मंगेशकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वागतपर भाषणाच्या सुरुवातीलाच आदिनाथ मंगेशकर यांनी वडिलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली. तसेच वडील लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित होते. दिग्गजांच्या उपस्थितीत पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. हा पुरस्कार देशाला समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान पुरस्कार स्वीकारल्यानंतर भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी हृदयनाथ मंगेशकर लवकर बरे होऊन घरी परतावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

मंगेशकर कुटुंबात हृदयनाथ मंगेशकर हे बाळासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत. ते मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे सर्वात लहान पुत्र. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडिकर यांचे धाकटे बंधू. हृदयनाथ मंगेशकर यांनी हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीसाठी अनेक गाण्यांना संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेली अनेक गाणी आजही प्रत्येकाच्या ओठी आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या