२४ ऑगस्टचा महाराष्ट्र बंद कसा असणार..?

काय राहणार सुरु असण काय राहणार बंद ?

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महविकास आघाडीने पुकारलेला बंद हा २ वाजपर्यंत असणार आहे. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली.

 

महत्वाचे मुद्दे…

  • राज्यातील अस्वस्थतेमुळे उद्या बंद आहे. राजकीय कारणासाठी बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे.
  • शाळेत मुलगी सुरक्षित राहील का? असा आई-वडिलांना वाटतं. अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे.
  • उद्याचा बंद हा महविकास आघाडी आणि मित्रपक्षाचा असणार आहे. जात-पात धर्म सोडून सर्वांनी सहभागी व्हावे.
  • कडकडीत बंद असायला हवा. रुग्णवाहिका, वृत्तपत्र सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. सणाचे दिवस आहेत. त्यामुळे बंद हा दुपारी २ वाजेपर्यंत करावा.
  • सरकारला काही म्हणू दे. मी जनतेच्या बाजूने बोलत आहे.
  • केवळ निवडणुकांमध्ये जनतेने मत व्यक्त करावे, असे नाही. इतर वेळी पण जनता व्यक्त होऊ शकते.
  • प्रशासन वेळीच कामाला लागले असते तर हे घडलं नसतं.
  • उच्च न्यायालयाने सरकारला थोबडवले आहे. जनतेचे न्यायालय वेगळे आहे.
  • जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात, तेव्हा जनतेचा दार खुले होते.
  • बंदचे यश अपयश हे संस्कृती आणि विकृतीवर राहणार आहे.
  • सरकारला दाखवून द्यायचे आहे.
  • लोकल, बस बंद ठेवावी, कारण संतापाचा बंद आहे.
  • सरकारच्या नेत्यांना पण मुली आहेत. बंदच्या मागून तुम्ही पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. बंदचा फज्जा उडवू देऊ नका. नाहीतर जनता तुम्हाला जागा दाखवेल. हा बंद तुमच्या कुटुंबासाठी पण आहे.
  • पोलिसांची महासंचालक महिला आहे. त्या पण लाडकी बहीण होऊ शकतात.
  • बाकी, मुख्यमंत्र्यांना राखी बांधायला जाऊ शकतात. कारण ते फक्त मत मागायला जातात.
  • स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हा, कारण तुमच्या मुलींसाठी हा बंद आहे.
  • कायदा जर आमचे रक्षण करत नसेल तर त्यांना त्यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.