मुंबई : राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, आणखी काही आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचे समोर येत आहेत. अशात आता आपल्या जळगाव जिल्ह्यातून किती आमदार एकनाथ शिंदे यांच्यसोबत आहेत, ते पाहूया….
जिल्हा – जळगाव
लता सोनवणे – चोपडा
किशोर पाटील- पाचोरा
चिमणराव पाटील – एरंडोल
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण
चंद्रकांत पाटील (अपक्ष) – मुक्ताईनगर