Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात सहा लाखांची घरफोडी उघड
    गुन्हे वार्ता

    भुसावळात सहा लाखांची घरफोडी उघड

    संशयित आरोपीला 48 तासात बेड्या : बाजारपेठ पोलिसांची कारवाई
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 5, 2026No Comments214 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील फातेमा कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून 5 लाख 70 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 4 लाख 99 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

    फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख (रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) हे 28 ते 30 मार्च दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात शिरून 5 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डी.बी. पथकाला सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमीर खान हबीब खान (वय 35, रा. न्यू ईदगा जवळ, भुसावळ) याला ताब्यात घेतले.

    पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अमीर खान याने एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 4 लाख 99 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, अक्षय कोतकर, प्रशांत सोनार, जीवन कापडे, जावेद शहा, सचिन चौधरी, महेंद्र पाटील आणि हर्षल महाजन यांच्या पथकाने केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif