Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हॉटेलच्या बिलाचा वाद विकोपाला : थेट बंदुकच रोखली
    गुन्हे वार्ता

    हॉटेलच्या बिलाचा वाद विकोपाला : थेट बंदुकच रोखली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    फैजपूर येथील हॉटेलमधील बिलाच्या वादातून जातिवाचक शिवीगाळ होऊन या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. हॉटेल व्यवस्थापक व त्याच्या दोन मित्रांना गावठी कट्ट्यासह रोखून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना मंगळवार दिनांक १० जून रोजी रात्री ११ ते ११. ३० वाजे दरम्यान फैजपूर शहरातील सुभाष चौकात घडली. यावेळी हवेत राऊंड ही झाल्याचे घटनेदरम्यान उपस्थितांकडून सांगण्यात आले. शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख व आकिब शेख या चौघांविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

    या बाबत मिळालेली माहिती अशी की, यावल रोडवरील मधुकर सह साखर कारखान्याजवळील हॉटेल तृभावी येथे दुपारी बिलावरून वाद झाला होता. यावेळी हॉटेल व्यवस्थापक सुमित ऊर्फ छोटू मार्तंड साळुंके. रा. फैजपूर. ता. यावल. याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. याचा जाब सुमित साळुंके यांनी फोनवरून विचारल्यावर वाद अधिक चिघळला. आणि याचा राग मनात धरून रात्री फैजपूर शहरातील सुभाष चौकात सुमित साळुंके व त्याचे मित्र अमोल तायडे आणि सागर भालेराव यांच्यावर आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू व गावठी कट्ट्याचा वापर करत बेदम मारहाण केली. या वेळी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. या मारहाणीत सुमित, आमिर आणि सागर हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    या संदर्भात फैजपूर पोलिस स्टेशनला सुमित साळुंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीं पैकी शेख आरिफ, शाहरुख शेख व आसिफ शेख यांना अटक करण्यात आली आहे तर आकिब शेख फरार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, यांच्या मार्गदर्शना खाली स. पो. नि. रामेश्वर मोताळे, पी एस आय नीरज बोकील व विनोद गभाने हे पुढील करीत आहेत.

    #crime #fight #gun Faijpur jalgaon Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif