Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»केमिकल टँकरचा भीषण अपघात : दोन ठार!
    अपघात

    केमिकल टँकरचा भीषण अपघात : दोन ठार!

    उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 5, 2026Updated:July 5, 2026No Comments203 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राष्ट्रीय महामार्गावर धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरने सबगव्हाण टोलनाक्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर व क्लिनर या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली आहे.

    या संदर्भातील माहिती अशी की, रात्री पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. यात केमीकलच्या टँकरने दिलेली धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर टँकरचा टायर फुटून अचानक आग लागली. या दुर्दैवी घटनेत टँकरमधील ड्रायव्हर व क्लिनर दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाच्या जवानांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून टँकरला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

    अपघातग्रस्त टँकर (क्रमांक जीजे-18 बीव्ही-8315) हा गुजरातहून ओडिशाच्या दिशेने जात होता. या टँकरमध्ये ‘टोल्युइन डायआइसोसायनेट’ नावाचे अत्यंत ज्वलनशील आणि क्रियाशील केमिकल होते. या केमिकलचा वापर प्रामुख्याने फोम, कोटिंग्ज आणि चिकटवणारे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सुदैवाने, आग लागूनही टँकरमधील हे केमिकल सुरक्षित राहिले, ज्यामुळे एक मोठी रासायनिक दुर्घटना टळली आहे.

    केमिकल टँकरचा अपघात झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली होती. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे सबगव्हाण टोलनाक्याजवळ सुमारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026

    मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!

    August 8, 2026

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदील

    August 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif