धानोरा-देवगाव रस्त्यावर भीषण अपघात ; पाच गंभीर…

0

 

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर व मॅक्झीमो यांच्यात जोरदार अपघात झाला असून, यात नऊ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३सी.४७४७ ही आयशर चोपड्यावरून जळगावकडे जात असतांना धानोरा गावाजवळ जळगावकडून चोपड्याकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच‌.१९बी.यु.४९७७ यांच्यात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात नऊ जण जखमी, तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जखमींची नवे खालील प्रमाणे…

नितीन सोनवणे (38), मनोज गवळी (35) सर्व शनिपेठ, शोभाबई विनोद आढाळे (30) पिंप्राळा, श्रीराम रुपसिंग (45), बन्सीलाल सुरसिंग (35), घनश्याम आढळकर (38) सर्व धानोरा तालुका चोपडा.

Leave A Reply

Your email address will not be published.