Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»हाहाकार ! होर्मुज खाडी बनली युद्धाचा आखाडा!
    ब्रेकिंग

    हाहाकार ! होर्मुज खाडी बनली युद्धाचा आखाडा!

    जगाची उडाली झोप : इराण आक्रमक भूमिकेत
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2026No Comments572 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी युद्धाचा आखाडा बनली आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढताना दिसत आहे. एकीकडे संपूर्ण जग प्रार्थना करत आहे की, होर्मुज खाडी सुरक्षित व्हावी. पण सध्याच्या घडीला सर्वकाही उलटे होताना दिसत आहे. होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतर इराण काही दिवस शांत होता. चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता होती. मात्र, नाकेबंदी कायम ठेवण्याची भूमिका अमेकिने घेतली.

    दरम्यान या नाकेबंदीमुळे इराणला मोठा नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांच्या बंदरातून एकही जहाज बाहेर येऊ शकत नाहीये. जगाला ज्याची भीती तेच आता होर्मुज खाडीत घडत आहे. काही दिवस शांत बसल्यानंतर इराण आक्रमक भूमिकेत होर्मुज खाडीत बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत 18 एप्रिल रोजी एका भारतीय जहाजावर गोळीबार झाला. त्यानंतर भारताने मोठा इशारा दिला. आता पुन्हा एकदा होर्मुजमध्ये वातावरण ताईट झाल्याचे बघायला मिळत आहे.

    नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज खाडीत पुन्हा एकदा एका जहाजावर मोठा हल्ला झाला. यावेळी इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून एका जहाजावर गोळीबार करण्यात आला. जहाजाच्या नियंत्रण कक्षाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. होर्मुज खाडीत तणाव यामुळे अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. परिस्थिती अधिक चिघळली आहे.

    होर्मुज खाडीत भारतासह अनेक देशांचे जहाज अडकले आहेत. होर्मुज खाडीत कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. प्रत्येक देश होर्मुज खाडीत अडकलेल्या आपल्या जहाजांविषयी चिंतेत आहे. यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने ओमानजवळ एका जहाजासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. माहितीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची एक गनबोट जहाजाजवळ आली.

    त्यावेळी त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले. या गोळीबारानंतर जहाजाला आग वगैरे न लागल्याची माहिती मिळत आहे. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेनंतर तणाव अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्याच्या घडीला होर्मुज खाडीकडे लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    बिअर बारमध्ये देशी दारू विक्रीचा व्हिडिओ काढला!

    August 28, 2026

    जळगावहून हैदराबादपर्यंत आरोग्यसेवेचा नवा ‌‘पूल‌’!

    August 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif