Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार
    शैक्षणिक

    गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार

    अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम : एकलव्य-द्रोणाचार्य नाटिकेतून गुरूशिष्याची महती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 29, 2026No Comments63 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव

    शिक्षणाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-सेकंडरी मध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

    अनुभूती इंग्लिशम मिडीयम स्कूल सेकंडरी मधील कार्यक्रमाची सुरुवात गुरुपौर्णिमेच्या दिनविशेषाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुची महती सांगणारे भावपूर्ण गीत सादर करून गुरुंच्या ज्ञानदानाच्या कार्याला अभिवादन केले. संत कबीर यांच्या विचारांचा प्रभावी आविष्कार घडविणारे ‘कबीर के दोहे’ विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी गुरुंचे जीवनातील स्थान आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद करणारे मनोगत व्यक्त केले. अरुणीच्या गुरुभक्तीवर आधारित नाटिकेने उपस्थितांना अंतर्मुख केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्य आणि भावपूर्ण गुरुवंदना यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा पर्यावरणपूरक पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला. पर्यावरणपूरक पद्धतीने व्यक्त केलेली ही कृतज्ञता कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या रश्मी लाहोटी होत्या. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना गुरुंच्या शिकवणीचे आचरण करत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “एक पेड माँ के नाम” हा संकल्प स्वीकारून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणात सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश दिला. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती हर्षा वाणी व पूजा पाटील यांची होती. कु. स्वरा महाजन व कु. जिविका जडे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

    चिमुकल्यांनी सदर केली एकलव्य-द्रोणाचार्य नाटिका 

    अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल-प्रायमरी मधील चिमुकल्यांनी एकलव्य-द्रोणाचार्य नाटिका सादर केली. संपूर्ण शाळेचे गीतासह समूह नृत्याताने दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली ग्रीडींग कार्ड व पुष्प देऊन गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या जीवनात गुरूंची महत्त्व काय असते यावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुरूपोर्णिमेचा सोहळा झाला. सोनाली पाटील, उज्ज्वला तळेले, अश्विनी दहाले यांनी सूत्रसंचालन केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif