Monday, August 15, 2022

सिंधी कॉलनीत घराला भीषण आग, घर जळून खाक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव; शहर येथील सिंधी कॉलनी सेवा मंडल परिसरातील एका घराला पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत घरातील सर्व संसारपयोगी साहित्य खाक झाले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सिंधी कॉलनी कॉलनीतील सेवा मंडळच्या समोर दिलीप कन्‍हैयालाल पमनानी यांच्या मालकीचे घर आहे. त्यांनी हे एका महिलेला भाड्याने दिले आहे. ही महिला काही दिवसांपासून हरिव्दार येथे गेली आहे. त्यामुळे सदरचे घर बंद आहे.

रविवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच भीषण रुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली.

त्यानुसार काही वेळातच चालक विक्रांत घोडेस्वार, वसंत दांडेकर, नंदकिशोर खडके, फायरमॅन भरत बारी, सोपान कोल्हे, नीलेश सुर्वे, भगवान जाधव या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन बंब घेवून घटनास्थळ गाठले.दोन अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत संपूर्ण घर खाक झाले आहे. घरात बोरिंग मशिनचा स्विच सुरुच होता. त्यामुळे शॉर्ट सर्कीट होवून लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या