Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»लोकशाही विशेष»होलिका दहनाचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व अन् लाभ
    लोकशाही विशेष

    होलिका दहनाचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व अन् लाभ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आज होळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.  रंगपंचमीच्या एक दिवस आधी म्हणजे आज होळीला होलिका दहन केले जाते, ज्यास ‘छोटी होळी’ किंवा ‘होलिका पूजन’ असेही म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणूनही होळी सण ओळखला जातो. होलिका दहन म्हणजे नकारात्मकता, अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे, सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील मानले जाते.

     

    पौराणिक कथा

    होलिका दहनासोबत हिरण्यकश्यप, त्याचा पुत्र प्रल्हाद आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे. हिरण्यकश्यप हा असुरराजा होता, जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राज्यात विष्णूभक्तीवर बंदी घातली होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले. शेवटी त्याने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादला जाळण्याचा आदेश दिला. होलिकाला अग्नीपासून संरक्षण करणारा वरदानप्राप्त वस्त्र मिळाले होते. ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे.

     

    अशी करा पूजा 

    स्वच्छ जागेवर होलिकेची रचना करावी. लाकूड, गवत, गव्हाच्या लोंब्या आणि गोवऱ्यांपासून होळी तयार करावी.

    पूजेचे साहित्य 

    गंध, हळद-कुंकू, फुले, रोळी, गूळ, नारळ, अक्षता, सुपारी, कापसाची वात, गव्हाच्या लोंब्या, हरभरे आणि होळीचा प्रसाद.

     

    पूजा विधी 

    संध्याकाळी शुभ मुहूर्तावर होलिका दहनापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर होलिकेला हळद-कुंकू, फुले वाहून प्रदक्षिणा घालावी. होलिका दहन : होळीला अग्नी दिल्यानंतर गव्हाच्या लोंब्या, हरभरे आणि नारळ त्यामध्ये अर्पण केले जाते.

     

    शुभ मुहूर्त

    होलिका दहन करण्यासाठी पंचांगानुसार प्रदोषकाल आणि भद्रानुसार शुभ वेळ निश्चित केली जाते. हा मुहूर्त संध्याकाळी असतो आणि पंचांग पाहून योग्य वेळ ठरवली जाते. होलिका दहन मुहूर्त रात्री 11.30 (PM) वाजेपासून ते मध्यरात्री 12.24 (AM) वाजेपर्यंत आहे.

     

    होलिका दहनाचे महत्त्व आणि  लाभ

    नकारात्मकता नष्ट होते : होलिका दहनामुळे जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

    आरोग्य सुधारते : होळीच्या अग्नीत अर्पण करण्यात येणारे गहू, हरभरे आणि औषधी पदार्थ हवेत शुद्धता निर्माण करतात.

    कुटुंबात आनंद आणि एकता येते : होळी हा रंगांचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे, त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नाते दृढ होते.

    धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ : होळीची पूजा केल्याने पापांचे क्षालन होते आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते, असे म्हणतात.

    शेती आणि उत्पादनासाठी शुभ काळाची सुरुवात : होळीच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात, यामुळे चांगले पीक आणि समृद्धी मिळते.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Holika Dahan 2025
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!

    October 14, 2026

    ऑक्टोबर हीट : बदलत्या हवामानाचे वास्तव

    October 13, 2026

    चित्रपट सृष्टीतील अवलिया अष्टपैलू : किशोर कुमार

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif