Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»पर्यावरण पूरक रंगांनीच होळी साजरी करा..!
    संपादकीय

    पर्यावरण पूरक रंगांनीच होळी साजरी करा..!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही संपादकीय लेख 

    विविध प्रकारचे रंग एकमेकांना लावून अथवा रंग उधळून होळी सणाचा आनंद साजरा केला पाहिजे. तथापि अलीकडे कोरड्या रंगांऐवजी पाणी मिसळून रंग एकमेकांना लावण्याच्या पद्धतीपर्यंत ठीक आहे. . परंतु विविध प्रकारचे रसायन मिसळून केलेले रंग एकमेकांना लावल्यामुळे अथवा संपूर्ण रंगांनी एकमेकांना पूर्णपणे भिजवून टाकल्याने रसायन मिश्रित रंग त्वचेवरून लवकर निघत नाही. उलट त्वचेचे रोग यामुळे होतात. नाकातोंडात रसायन गेल्यामुळे तर रोगांना इतर रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे होळीच्या निमित्ताने खेळण्यात येणाऱ्या रंगोत्सवाला अलीकडे हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. यातून आपण होलिकोत्सवाच्या आनंद लुटताय असे वाटणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

    अलीकडे रंगांऐवजी त्यामधील पाणी अंगावर फेकून ओले करण्याची मजा वाटते. परंतु रंगोत्सवाचा आनंद मात्र त्यातून मिळत नाही. उत्तरेकडे मथुरा वृंदावन आदी ठिकाणी होळीचे सण पाच दिवस साजरे केले जातात. त्या पाच दिवसांच्या रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण देशातील भाविक त्यात सामील होतात. वृंदावनला जणू हे पाच दिवस यात्रेचे स्वरूप आलेले असते. लाखो भाविक वृंदावनात होळीच्या रंगोत्सवात सामील होतात. वृंदावनाच्या होळीला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झालेले असते. त्यामुळे संपूर्ण वृंदावनात भाविक तल्लीन होऊन रंगोत्सवात सहभागी होतात. परंतु महाराष्ट्रात होळीच्या रंगोत्सवाला अलीकडे हिडीस स्वरूप प्राप्त होण्याला युवा पिढी जबाबदार आहे.

    होळी असो अथवा ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असो. त्याचा आनंदोत्सव साजरा करून निर्मळ आनंद लुटण्याऐवजी नशेच्या पदार्थांचे सेवन करून नशेत धांगडधिंगा घालण्यात तरुणाईला एक प्रकारची वेगळीच मजा वाटते. महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला रंग खेळतात. रंग खेळणे कमी आणि नशेत तर होऊन धांगडधिंगा घालणे यालाच जास्त प्राधान्य दिले जाते. तरुणांबरोबर तरुणी सुद्धा त्यात सामील झाल्यामुळे त्याला आणखीनच वेगळे स्वरूप प्राप्त होते. बरे तरुणाई मध्ये हा धांगडधिंगा प्रकार सुरू झाला तो तरुणांना दोष देऊन चालणार नाही. वयस्क मंडळी सुद्धा रंगांऐवजी नशिले पदार्थ प्राशन करायला प्राधान्य देतात आणि नशिलेपणातच रंग लावण्याचा प्रकार करतात. कुठेतरी याच्यावर बंधन घातले गेले पाहिजे. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला वेगवेगळे आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाले आहेत. त्या अध्यात्मिक अर्थाचा आनंद लुटण्याऐवजी वेगळाच धांगडधिंगा करायचा, हा चुकीचा पायंडा पडत आहे. त्यासाठी पालकांवर फार मोठी जबाबदारी येते.

    आपल्या पाल्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. वयस्कर लोकांनी स्वतःवर बंधने घालून घ्यावीत. यंदाच्या होळीला असे हिडीस प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नशा केली म्हणजे होळीचा सण साजरा होतो असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. नशेच्या पदार्थाच्या सेवनामुळे एक तर आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात, उलट नशेमुळे गटागटात भांडणे होऊन मारामारी पर्यंत त्याचे स्वरूप जाते. त्यामुळे यंदाच्या होळीपासून आपण पर्यावरण पूरक रंगांची होळी खेळून ती साजरी करण्याचा संकल्प घेऊया आणि रंगोत्सव साजरा करताना नशेच्या

    #holi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!

    August 12, 2026

    ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!

    August 11, 2026

    महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif