Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»रावेर येथील ऐतिहासिक लक्ष्मीनारायण मंदिर आगीत भस्मसात
    अपघात

    रावेर येथील ऐतिहासिक लक्ष्मीनारायण मंदिर आगीत भस्मसात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 19, 2026No Comments625 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    रावेर

    रावेर शहरातील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री लक्ष्मीनारायण मंदिराला मध्यरात्री भीषण आग लागून मंदिर मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अंदाजे एक वाजेच्या सुमारास मंदिरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. मंदिराला आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सन १७०० च्या सुमारास बांधण्यात आलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे रावेर शहरातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते. संपूर्ण सागवान लाकडापासून उभारण्यात आलेल्या या मंदिरावर अत्यंत सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम करण्यात आले होते. मंदिरातील जुने नक्षीदार सागवान लाकूड तसेच आतील अनेक भाग आगीत पूर्णपणे जळून खाक झाले.

    माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या मनमोहक मूर्ती असलेल्या या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे होते. मंदिराची भव्य रचना आणि कलात्मक बांधणी हे शहराचे आकर्षण मानले जात होते. त्यामुळे मंदिर जळाल्याची घटना नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. दरम्यान, रावेर, सावदा आणि फैजपूर नगरपालिकांच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif