यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई येथे 26-11-2008 या दिवशी अतिरेकी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात मूळ हिंगोणा येथील रहीवाशी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते. त्यांच्या आठवणी निमित्त हिंगोणा येथे त्यांच्या मूळ गावी ग्रामपंचायत परिसरात शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. या अतिरेकी हल्ल्यास आज 16 वर्षे पूर्ण होत आहे. परंतु आज देखील शहिदांचे बलिदान व स्मारक हे मनापासून आठवण करून देत आहे.
हिंगोणा येथे शहीद स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मनापासून इच्छा होती त्यावेळेस तत्कालीन आमदार स्वर्गवासी हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. हिंगोणा येथील शहीद स्मारक युवकांसाठी ठरतेय प्रेरणादायी मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात हिंगोणा शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी हे कर्तव्य बजावत असतांना शहीद झाले होते. ते अतिरेक्यांचा पहिला बळी ठरले होते.
या अनुषंगाने हिंगोणा येथे त्यांच्या मूळ गावी सन 2019 मध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधी मधून स्मारकाचे बांधकाम व लोकार्पण करण्यात आले होते. ग्रामपंचायती मार्फत त्या स्मारकाची साफसफाई करण्यात आली. तसेच आज दि. २६ रोजी रात्री दिपप्रज्वलन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात येते. सदर शहीद स्मारक हिंगोणा येथे बांधण्यात यावे अशी हिंगोणा ग्रामस्थांची आग्रही मागणी होती.
परंतु या विषयाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने हिंगोणा येथील सागर महाजन मनोज वायकोळे भरत पाटील विष्णु महाजन बाळु कुरकुरे यांनी तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांच्याकडे स्मारक बांधण्यासाठी तगाद लावून धरला होता. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागण्याची दखल घेत हरिभाऊ जावळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या ठिकाणी स्मारक बांधकाम करण्यात आले आहे.