पारोळ्यात शांतता कमिटीच्या बैठकीत एकोप्याने सण उत्सव साजरा करण्याचा निर्णय…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दश व ईद-ए-मिलाद हे दोघेही हिंदू व मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे, शांतता कमिटीच्या बैठकीत मुस्लीम बांधव दि. २९ रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा करणार असल्याची माहिती देण्यात आली असून, ता. २८ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी हिंदू बांधव गणरायाचे विसर्जन करणार असल्याचे एकमत शांतता कमिटीत पारोळ्यात दोघी सण एकोप्याने साजरे होणार असल्याचे पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

दि १० रोजी पोलीस स्टेशनला हिंदू मुस्लिम बांधवांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय  घेण्य्हात आल्याचे ते बोलत होते. या बैठकीत हिंदू बांधव तसेच मुस्लिम बांधव तसेच शांतता कमिटीचे सदस्य व  पत्रकार उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, दि १४ सप्टेंबर पासून विविध सणांना सुरुवात होत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत तसेच जातीय सलोखा टिकावा व जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने तालुक्यात होणारे सण उत्सव हे शांततेच्या मार्गाने सुरळीत पार पडण्यासाठी जी हिंदू- मुस्लिम बांधवांनी परंपरा अबाधित ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर एकोप्याने सण उत्सव साजरे करावे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

दरम्यान सण उत्सव काळात कायद्याचे पालन करावे, जे कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेत यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी शहरातील आजवरचा इतिहास सांगत, येणारे सण उत्सव एकोप्याने साजरे करत शांततेचे वातावरण ठेवू असे आश्वासन यावेळी बैठकीत दिलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.