जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ – प्रशांत जुवेकर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ (Hindu Rashtra Sankalp Abhiyan) राबवले जात आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर ३१ ऑगस्टपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत राबवले जाईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक यांनी जळगाव (Jalgaon) येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रथितयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस हे उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानातील विविध उपक्रम !

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानात ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या रविवारी, २ ऑक्टोबर या दिवशी जळगाव शहरात ला. ना. शाळेतील गंधे सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता हिंदु संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता यांच्या बैठकाही आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत, अशी माहिती प्रशांत जुवेकर यांनी दिली.

“या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. हे अभियान चालू झाल्यापासून विविध संघटना, संप्रदाय यांना सोबत घेऊन आयोजित केलेल्या समितीच्या विविध उपक्रमांना समाजातून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १३१ ठिकाणी हिंदुराष्ट्र संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली, २ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली, ७ ठिकाणी विविध विषयांवर व्याख्याने घेण्यात आली. पुढे ७ ऑक्टोबरला चोपडा येथे तर १६ ऑक्टोबरला फैजपूर येथे हिंदू संघटन मेळाव्याचे आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे,” असे प्रशांत जुवेकर म्हणाले.

हिंदू शक्तीला संघटित करण्याचे कार्य समितीने केले ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

स्थापनेपासून समितीने अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, पत्रकार-संपादक असे विविध क्षेत्रातील हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले आहे. आज जवळजवळ देशभरातील ५०० हुन अधिक हिंदुत्ववादी संघटनांना एका ठिकाणी आणण्याचे, त्यांना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी दिशा देण्याचे व्यापक कार्य समिती करत आहे. यासाठी समितीने आतापर्यन्त जी १० राष्ट्रीय हिंदू अधिवेशन घेतली त्यात सनातन संस्थाही सहभागी झाली. समितीच्या विविध उपक्रमात म्हणजे सभा, प्रांतीय-जिल्हा स्तरीय अधिवेशन आदी उपक्रमात सनातनचे साधक सहभागी होत असतात, असे मत चेतन राजहंस यांनी मांडले.

धर्माचरण करून आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठ समितीने शिकवला ! – अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले

समिती जे विविध उपक्रम राबवते त्याचा पाय अध्यात्मिक अधिष्ठान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जाते. यामुळे अनेक युवक आज धर्माचरण करून आदर्श जीवन जगण्याचा पर्यटन करू लागले आहेत. असे प्रतिपादन अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले यांनी केले.

सामान्य हिंदूला हिंदू राष्ट्राचे ध्येय दाखवण्याचे कार्य समितीने केले आहे ! – अधिवक्ता गोविंद तिवारी

स्वा. सावरकर यांनी हिंदु राष्ट्रासाठी तळमळीने कार्य केले. त्यांचा हाच वारसा समिती पुढे चालवत आहे. आज देशात सर्वत्र सातत्याने हिंदू राष्ट्राची मागणी जी समिती विविध उपक्रमातून करत आहे, त्यातून सामान्य हिंदूला हिंदू राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करण्याचे व्यापक कार्य समिती करत आहे, असे हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.