Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हिंदू मुली टार्गेट; धर्मांतर करून लैंगिक शोषण!
    गुन्हे वार्ता

    हिंदू मुली टार्गेट; धर्मांतर करून लैंगिक शोषण!

    नाशिकच्या आयटी कंपनीत वरिष्ठांकडून गंभीर प्रकार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments622 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिकच्या आयटी कंपनीत वरिष्ठांकडूनच कथित धर्मांतर करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत धर्मांतर करून महिलांचं लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण देशच हादरला आहे. या प्रकरणात कंपनीच्या टीम लीडरसह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक महिला अजून फरार आहे. या कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या तपासात आणखी काही धक्कादायक आणि डोकं चक्रावणारी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली आहे.

    नाशिकमधील नामांकित कंपनीत कथित धर्मांतर प्रकरण उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील पीडीत तरुणीच्या वर्तवणुकीत मोठा बदल घडून आल्याचं समोर आलं आहे. या पीडीत तरुणाने सलग दोन वर्ष महिनाभर रोजे ठेवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ही तरुणी हिंदू आहे. हिंदू असूनही ही तरुणी हिंदू मैत्रिणींसोबत जेवण्यास नकार देत होती. तिने गेल्या वर्षापासून लिपस्टिक लावणेही बंद केलं होतं. तसेच संशयित आरोपी दानिश हा विवाहित असल्याची माहिती तिला मिळाली होती. पण त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, अशी माहितीही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

    आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही त्याच्या जाळ्यात सहभाग असल्याची शक्यता आहे. या आरोपीने संबंधित तरुणीला “विशिष्ट पोषाख ट्राय कर” म्हणत मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच वेळप्रसंगी तिच्यावर जबरदस्ती केल्याचीही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

    दरम्यान मल्टिनॅशनल कंपनीतील या कथित धर्मांतरणाविरोधात नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात केवळ धर्मांतरच नव्हे तर जबरदस्तीने छेडछाड केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. देवळाली पोलीस ठाण्यात जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आणि बलात्कार केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात इतर 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 9 गुन्ह्यातील 4 गुन्हे हे छेडछाडीचे आणि तीन गुन्हे छेडछाड आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आहेत. एक गुन्हा धार्मिक द्वेष पसरवल्याचा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीतील हिंदू कर्मचाऱ्यांना नमाज पढण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. तसेच त्यांना नॉनव्हेज खायला भाग पाडून त्यांचं लैंगिक शोषण केलं जात होतं. नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या टोळीशी संबंधित नेटवर्कचा शोध घेत आहेत. या कंपनीतील अन्य कर्मचारीही धर्मांतराला बळी पडले का? याचीही कसून चौकशी केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif