Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची !
    महाराष्ट्र

    महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) पायाभूत आणि शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मंजूरी दिली आहे. महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकणं सक्तीचं करण्यात आलं आहे. 2024 च्या राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडानुसार आता मराठीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी, इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

    तर मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांशिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन प्रमुख भाषा शिकवणं सक्तीचं असणार आहे. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

    राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत आणि शालेय स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केले आहेत. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मंजूरी दिली आहे. त्यानंतर शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुकाणू समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यातच हिंदी सक्तीने शिकवण्याबाबतच्या प्रस्तावावर याआधी टीका करण्यात आली होती. मात्र आता शासन निर्णयामुळे शाळेत हिंदी सक्तीने शिकवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

     

    #hindi Schools
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif