Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकशाही विशेष»सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त : पद्मभूषण देवकी जैन
    लोकशाही विशेष

    सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त : पद्मभूषण देवकी जैन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 26, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नव दुर्गा (महिला अर्थतज्ज्ञ)

    ज्या काळात देशातील व्यापक सामाजिक धोरणात स्त्रीच्या अस्तित्वाच्या जाणिवेचे प्रतिबिंब दिसू लागलं नव्हतं आणि भारतीय स्त्रीवादी अर्थशास्त्रविचारांची पायाभरणी करण्याचं श्रेय ज्यांना जाते अश्या आपल्या आजच्या नव दुर्गा आहेत देवकी जैन.

     

    पार्श्वभूमी:

    देवकी जैन (जन्म १९३३) ह्या एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. ज्यांचे स्त्रीवादी अर्थशास्त्रात कौशल्य आहे. देवकी जैन यांनी १९५३ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून तीन सुवर्णपदके मिळवून पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी ऑक्सफर्ड येथील सेंट अॅन्स कॉलेजमधून तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली, त्यानंतर त्यांनी १९६९ पर्यंत दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र शिकवले. सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण मिळाला आहे. त्या नवी दिल्लीतील सामाजिक अभ्यास संस्थेच्या संस्थापक होत्या. वयाच्या ८७ व्य वर्षी त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र ‘दि ब्रास नोटबुक ‘ (पितळी नोंदवही) प्रकाशित झाले.

     

    महत्वपूर्ण कामगिरी :

    त्यांनी स्त्रीवादी अर्थशास्त्रात ओळखले जाणारे आणि अग्रगण्य काम केले आहे. त्यांचे काम गांधीवादी तत्वज्ञानाने प्रभावित आहे. त्यांचे संशोधन समता, लोकशाही विकेंद्रीकरण, लोककेंद्रित विकास आणि महिला हक्कांच्या मुद्द्यांवर देखील केंद्रित आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला चळवळींमध्येही त्यांनी उल्लेखनीय सहभाग दर्शविला आहे. प्रचलित लिंग-तफावत असूनही महिला अर्थशास्त्रज्ञांनी जागतिक व्यासपीठावर त्यांची उपस्थिती दर्शविली आहे. देवकी जैन यांनी ‘इन्स्टिटयूट ऑफ सोशल स्टडीज् ट्रस्ट, नवी दिल्ली’ स्थापन केली. १९७५ मध्ये त्यांनी ‘इंडियन विमेन’ हे पुस्तक संपादित केलं. ते वर्ष संयुक्त राष्ट्रांनी ‘स्त्री वर्ष’ म्हणून जाहीर केलं होतं. त्यानिमित्तानं भारतातही शासनाच्या वतीनं ‘टूवर्डस इक्वालिटी’ हा अहवाल जाहीर झाला होता. सर्वप्रथमच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं प्रमाण, पुरुषांशी तुलनात्मकदृष्ट्या किती आहे हे तपासलं गेलं होतं. देवकी जैन याही या अभ्यासात सहभागी होत्या.

    या महिला अर्थशास्त्रज्ञ सर्व तरुण अर्थतज्ज्ञांसाठी प्रेरणा आणि प्रेरणा स्रोत आहेत! त्यांनी ‘गरिबीचे स्त्रीकरण’ हा शब्द सादर केला होता जो तीन घटकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जात होता: महिलांमध्ये गरिबीचे प्रमाण जास्त असते, त्यांना तोंड द्यावे लागणारी गरिबी पुरुषांनी अनुभवलेल्या गरिबीपेक्षा अधिक गंभीर असते आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबीकडे कल दिसून आला आहे, जो महिलांच्या नेतृत्वाखालील कुटुंबांच्या वाढत्या दराशी संबंधित आहे. त्यांच्या मते, स्त्रीकरण म्हणजे महिलांच्या वाढत्या उपस्थितीचे अवमूल्यन आणि ‘कामाचे स्त्रीकरण’ म्हणजे कमी दर्जाचे, कमी पगाराचे काम.

    त्या ‘इंडियन वुमन’ च्या संपादिका होत्या आणि त्यांनी ‘वुमन, डेव्हलपमेंट अँड द युएन: साठ-वर्षीय समता आणि न्यायासाठी शोध’ हे पुस्तक लिहिले. महिलांचे योगदान कसे बदलले आहे आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये विकास आणि पद्धतींना आकार कसा दिला आहे हे त्यांनी दाखवले आहे. त्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज ट्रस्टच्या संस्थापक आहेत जिथे त्या १९९४ पर्यंत संचालक होत्या आणि यूएनडीपीमध्ये सल्लागार समितीच्या सदस्या आहेत. २००६ मध्ये महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायात योगदान दिल्याबद्दल त्यांना पद्मभूषण, हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्रीवादी अर्थशास्त्रातील त्यांचे कार्य भारत आणि जगभरातील अनेक महिलांसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.

     

    डॉ. रिता मदनलाल शेटीया

    (लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.)

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनिलभू… आता जोमाने कामाला लागा!

    September 3, 2026

    निष्पाप बळी : लोकप्रतिनिधी मूग गिळून का?

    August 26, 2026

    रक्षाबंधन आणि बहिणींची सुरक्षा!

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif