मुंबई
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरलेला दिसून येत आहे अश्यात पुन्हा हवामान विभागाने राज्यात पुढील 12 तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यात 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, काल दुपारनंतर पावसाने जोर धरला, तर आज सकाळपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांलाही हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.