Monday, November 28, 2022

खळबळजनक; गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा; विद्यार्थिनींचे बनवले १२०० नग्न व्हिडीओ…

- Advertisement -

 

- Advertisement -

बंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा बसवून (Hidden camera in girls hostel) विद्यार्थिनींचे जवळपास १२०० अर्ध नग्न व्हिडीओ शूट केले आहे. या खळबळजनक घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे असून त्यांची चौकशी सुरु आहे. शुभम एम आझाद असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आरोपीने मुलींच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. त्याने १२०० हून अधिक व्हिडिओ आणि मुलींचे फोटो काढले आहेत. होसाकेरेहल्लीजवळील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याला मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी शुभमनं त्याच्या मैत्रिणीचे देखील अर्धनग्न फोटो काढले होते. वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा बसवताना मुलींना त्याला पकडलं, मात्र तेव्हा त्याने तेथून पळ काढला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वसतिगृहात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि हा प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फोन जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी पी कृष्णकांत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्यानं हे घाणेरडं कृत्य केलं आहे. विविध कलमांअंतर्गत आरोपीविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.

यापूर्वीही शुभमनं असंच कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. लेखी माफीनामा सादर केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या