Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिंदेंच्या आमदाराविरोधात अभिनेत्रीची पोलिसात धाव
    महाराष्ट्र

    शिंदेंच्या आमदाराविरोधात अभिनेत्रीची पोलिसात धाव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 13, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे.  भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. यासंदर्भात अभिनेत्री हेमांगी राव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि सह अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणाऱ्या हेमांगी राव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील शिवसेनेचे आमदार आणि नवी मुंबई येथील एका व्यावसायिकाविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भूखंड लाटण्यासाठी धमकावल्याचा आरोप आमदारावर करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार थोरवे यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची चर्चा आता रायगडमध्ये होऊ लागली आहे.

    अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे डॉक्टर पती विनोद राव यांची मुंबई- पुणे जुन्या महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांडरोली गावाच्या हद्दीत जमीन आहे. नवी मुंबई येथील व्यावसायिक विकासक दीपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. मात्र तरी देखील वाधवा ही जमीन बळजबरीने आणि दादागिरीचा वापर करत हस्तगत करत असल्याचा आरोप राव कुटुंबांने केला आहे.

    जमीन जबरदस्तीने बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार महेंद्र थोरवे हे मदत करत आम्हाला धमकावत असल्याचा आरोप अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. पत्रकार परिषदेत या अभिनेत्रीने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. ४ वेळा पोलिसांत तक्रार करुनही पोलिस याची दखल घेत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली बाबतही अभिनेत्रीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे देखील या अभिनेत्रीने सांगितले आहे.

    Hemangi Rao Mahendra Thorve raigad
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif