Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल गरजेचे !
    ब्रेकिंग

    किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल गरजेचे !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल गरजेचे !

    नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहाराच्या सवयींमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यात किडनीचे आजारही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

    किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ गाळण्याचे काम करते आणि शरीरातील पाणी, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण नियंत्रित करते. तसेच, व्हिटॅमिन डीचे सक्रिय स्वरूपात रूपांतर करून हाडांचे आरोग्य सुधारते. बदलत्या आहाराच्या सवयींमुळे किडनीवरील ताण वाढत आहे. त्यामुळे योग्य आहार आणि जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे.

    किडनीसाठी उपयुक्त आहार कोणता?
    दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे नेफ्रोलॉजी व किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. राजेश अग्रवाल यांच्या मते, किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही आहार महत्त्वाचा ठरतो.

    हिरव्या पालेभाज्या आणि फळे – पालक, ब्रोकोली, सफरचंद, डाळिंब, संत्री यांसारखे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण पुरवतात.
    पुरेसे पाणी प्या – दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिल्याने किडनीतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
    प्रथिनयुक्त आहार – संतुलित प्रमाणात उकडलेले अंडे, डाळी, चीज, सोया, मासे इत्यादी पदार्थ आहारात असावेत.
    डिटॉक्स ड्रिंक्स – कोमट पाणी, लिंबू पाणी आणि ग्रीन टी यांचा समावेश केल्यास किडनी स्वच्छ राहते.

    किडनीसाठी हानिकारक गोष्टी टाळा!
    जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न – यामध्ये जास्त सोडियम आणि हानिकारक घटक असतात, जे किडनीवर ताण आणतात.
    तळलेले आणि मसालेदार पदार्थ – यामुळे रक्तदाब वाढतो, जो किडनीसाठी घातक ठरतो.
    अल्कोहोल आणि तंबाखू सेवन – हे किडनीवर गंभीर परिणाम करू शकतात.
    जास्त प्रमाणात पेनकिलरचे सेवन – पेनकिलरचे अतिरिक्त सेवन थेट किडनीचे नुकसान करू शकते.
    लघवी रोखणे टाळा – वारंवार लघवी करण्याची इच्छा होत असल्यास तिला अडवू नये.

    किडनीच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, पुरेसं पाणी आणि नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. मसाले आणि मीठ नियंत्रित प्रमाणात घ्या, तसेच शारीरिक हालचाली वाढवा. योग्य सवयी अंगीकारून किडनीचे आरोग्य कायम राखता येईल.

    लेख हा सामान्य ज्ञानावर आधारित असून याला आम्ही कुठलाही दुजोरा देत नाही

    Helth kidny
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif