Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»चाळीसगाव परिसरात मुसळधार पावसाचा थरार
    ताज्या बातम्या

    चाळीसगाव परिसरात मुसळधार पावसाचा थरार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 28, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून खूप मोठ्या प्रमाणात (35188 क्युसेक) पाण्याचे विसर्ग धरणातून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह मन्याड धरणाची व धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या नांद्रे गावाची पाहणी केली. पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नांद्रे गावाच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तयार राहण्याच्या सूचना दिल्या. शासन, प्रशासन आपल्या सोबत असून कुठल्याही प्रकारची आपल्याला कमतरता पडणार नाही याची ग्वाही आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिली.

    यावेळी त्यांनी गिरणा व मन्याड नद्यांचा संगमावर असणाऱ्या सायगाव येथे भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असून खबरदारीच्या दृष्टीने सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांनी आपल्या कुटुंब व जनावरांसह स्थलांतरित होण्याची विनंती केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी वैयक्तिक शासन – प्रशासनासह परिस्थीतीवर लक्ष ठेवून असून स्थानिक भाजपा पदाधिकारी देखील मदतीसाठी सदैव उपलब्ध आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व आपली काळजी घ्यावी असे आवाहन केले.

     

    शेंदुर्णीत मुसळधार पाऊस : पुराचा फटका

    शनिवारी शेंदुर्णी व परिसरात प्रचंड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. दुपारीच आभाळ भरुन आले होते. प्रचंड मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे शेतातील पिके धोक्यात आली असुन सर्व धरणं ओलांडुन वाहत आहे. सोन नदीला यंदाच्या मोसमात आलेला हा ६ वा मोठा पुर आहे. गणेशोत्सव, पितृपक्षात आणि आता नवरात्रोत्सवात सुद्धा पावसाने कहर केला असुन यामुळे शेतातील कपाशी, मका व केळी पिकाला यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. शहरातील विविध नवीन वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी साचले असुन गारा, चिखल झाला असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. यंदाच्या मोसमात सोन नदीला ६ वा प्रचंड आलेला पुर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif