Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»हतनूर धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस
    जळगाव जिल्हा

    हतनूर धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस

    66.88 टक्के पाणीसाठा : धरणातून विसर्ग सुरू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 24, 2026No Comments201 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्ह्याच्या जलव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या धरणात 66.88 टक्के एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जून ते 23 जुलै या कालावधीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2,334 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 117.4 मिमी पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे.

    दि. 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत धरणाची जलपातळी 211.550 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची पूर्ण जलाशय पातळी 214.000 मीटर आहे. सध्या धरणात 259.50 दशलक्ष घनमीटर (66.88 टक्के) एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी 126.50 दशलक्ष घनमीटर (49.61 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी 0.25 मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून 37 क्युमेक्स (1,307 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून 5.66 क्युमेक्स (200 क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे. आर.एस. गेटमधून सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

    पाणलोट क्षेत्रातील विविध ठिकाणीही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. अकोला येथे 28.6 मिमी, चिखलदरा 24 मिमी, बऱ्हाणपूर 13.06 मिमी, लोहारा 11 मिमी, गोपालपुरा 6.2 मिमी, एरंडी 2.4 मिमी, दीडतलाई व लखपुरी येथे प्रत्येकी 2.2 मिमी, तर टेक्सा येथे 1.4 मिमी पाऊस झाला. हातनूर परिसरात 16 मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील तेथील एकूण पाऊस 149 मिमीपर्यंत पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif