Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट
    हवामान

    महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अलर्ट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 31, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क  

    राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून काही भागात पाऊस ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, काही भागात पावसाने विश्रांती घेतलेली नाही. आजही भारतीय हवामान खात्याने काही भागात अलर्ट जारी केलाय. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस चांगला असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवलाय. पंढरपुरकडेही पाऊस चांगला असल्याने धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. दरवर्षापेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला. विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्वच ठिकाणी मॉन्सूनच्या पावसाचा जोर बघायला मिळाला.

    भारतीय हवामान खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. विजेंच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसळतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूचन पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळाले.

    देशातील इतर भागांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस पडताना दिसला. मात्र, आता परत पाऊस कमी जास्त होताना दिसतोय. राज्यातील काही भागांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे.

    आज भारतीय हवामान विभागाने नागपूर, अमरावती, वर्धा, गोदिंया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात यंदा चांगलाच जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नद्या भरून वाहत आहेत. मध्यंतरीच्या पावसाने गडचिरोलीच्या काही भागांचा संपर्क देखील तुडला होता. खडकवालसला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने लगतच्या भागांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत पाऊस दिसतोय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif