Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
    हवामान

    महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

    उकाड्यापासून दिलासा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 31, 2026No Comments455 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात रविवारी मान्सूनपूर्व पावसाने अनेक भागांत दमदार हजेरी लावत उष्ण आणि दमट हवामानापासून नागरिकांना मोठा दिलासा दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी तसेच विदर्भातील काही भागांत हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. काही ठिकाणी सकाळच्या सत्रात जोरदार पावसाची नोंद झाली असून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्या.

    हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही भागांत दुपारनंतर पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक आणि घाट परिसरातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जळगावमध्ये मंगळवारपर्यंत तर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूरसह अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून मान्सूनच्या प्रगतीला वेग आला आहे. केरळमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत नैऋत्य मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे. शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप

    September 16, 2026

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif