काळजी घ्या.. राज्यात उन्हाचा चटका वाढला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होतोय. त्यातच आता उन्हाचा चटका लागायला सुरुवात झाली आहे. म्हणून उन्हात जात असाल तर काळजी घ्या असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.  रविवारी सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली.  सोमवारी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान ३५ अंशांपार आहे. अनेक ठिकाणी ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने उकाडा वाढला आहे. तसेच येत्‍या दोन दिवसांत पुण्‍यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्‍याचा अंदाज हवामान विभागाने व्‍यक्‍त केला आहे. त्‍यामुळे आणखी उकाडा वाढण्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान किमान तापमान मात्र पुढील काही दिवस स्थिर राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुण्‍यातील बहुतांश भागातील कमाल तापमान रविवारी ३४ ते ३५ अंशाच्या दरम्‍यान नोंदवले गेले. कोरेगाव पार्क, मगरपट्टा येथे ते जास्‍त होते, तसेच किमान तापमानही पुण्‍यातील २५ वेगवेगळ्या भागांमध्‍ये २२.७ ते १४.४ च्‍या दरम्‍यान नोंदवले गेले. यापैकी २२.७ हे दापोडी, तर वडगावशेरी, चिंचवड, लवळे येथे २० च्‍या दरम्‍यान होते. राजगुरुनगर, आंबेगाव, निमगिरी येथे १७ अंशाच्‍या दरम्‍यान ते होते. येत्‍या आठवडाभरात आकाश निरभ्र राहणार असून, सकाळी विरळ धुके पडण्‍याचा अंदाजही हवामान विभागाने व्‍यक्‍त केला.

महाराष्‍ट्रातील कोकण, गोवा, मध्‍य महाराष्‍ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्‍याचा अंदाज आहे. दरम्यान, सोलापूर ३६ डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी ३५.४ डिग्री सेल्सिअस, जेऊर ३५ डिग्री सेल्सिअस, अकोला ३५.

 

ठिकाणे तापमान कमाल तापमान किमान

 

पुणे—३४.२—१६.४

 

अहिल्यानगर—३३.८—१५.७

 

धुळे—३१.८—११.८

 

जळगाव—३२.२—१६.५

 

जेऊर—३५—१७.५

 

कोल्हापूर—३२.८—१९.८

 

महाबळेश्‍वर—२८.३—१७.५

 

मालेगाव—३२.६—१५.६

 

नाशिक—३३.७—१६.४

 

निफाड—३२.८—१४

 

सांगली—३४.२—१८.८

 

सातारा—३४—१७.५

 

सोलापूर—३६—२२.६

 

सांताक्रूझ—३४.५—२०

 

डहाणू—३०.७—१८.२

 

रत्नागिरी—३५.४—२०.५

 

छत्रपती संभाजीनगर—३३.५—१८.६

 

धाराशिव—३३—१७

 

परभणी—३४.७—१८.१

 

परभणी (कृषी)—३४—१६

 

अकोला—३५—१९

 

अमरावती—३२.४—१६.१

 

भंडारा—३१.६—१६.१

 

बुलढाणा—३४—२०

 

ब्रह्मपूरी—३४.४—१५.५

 

चंद्रपूर—३२.८—निरंक

 

गडचिरोली—३३.२—१५.६

 

गोंदिया—३०.६—१६.४

 

नागपूर—३२.४—१५

 

वर्धा—३२—१६.४

 

वाशीम—३४.६—२०.८

 

यवतमाळ—३३.६—१८

 

Leave A Reply

Your email address will not be published.