पुढील दोन दिवसात मुंबईत उष्णतेची लाट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हळूहळू वातावरणात वाढ होत असल्याचे जाणवत आहे. महाराष्ट्रात बहुतांश भागात तापनामाने ४० पार केल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दमट वातावरणामुळे हैराण झालेले मुंबईवासीयांना पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat Waves) सामना करावा लागणार आहे. यामध्ये मुंबई (Mumbai) शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांशी भागात पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असल्याने घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या आणि तब्येत सांभाळा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईत वाढलेल्या हवा प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये आधीच श्वसनाचे आजार वाढले आहेत.

शनिवारी सुद्धा तापनामात वाढ

बदलत्या वातावणामुळे मुंबईकर हैराण आहेत. आता तर तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत शनिवारीही चांगलाच उकाडा होता. अनेक ठिकाणी पारा 36 ते 38 अंशांपर्यंत गेल्याने मुंबईकरांना उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.