Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
    जळगाव

    ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

    अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या रंगकर्मीला निरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 8, 2026Updated:July 8, 2026No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अनेकांना घडविणारा, अनेकांच्या भावविश्वाला आकार देणारा आणि अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देणारा माणूस आपल्या सर्वांना सोडून देवाघरी निघून गेला आहे. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार, लावलेली सवय, दिलेला विचार आणि सांगितलेला प्रत्येक शब्द आठवून त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे नुकतेच एका भावपूर्ण श्रद्धांजली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

    विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी येथील व. वा. वाचनालयाच्या ज्या रामनारायण सभागृहात एकाच दिवशी एकाच बालनाट्याचे दहा प्रयोग करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला होता, त्याच सभागृहात या शोकसभेचे आयोजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेसाठी पुणे येथून ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या सहचरिणी अंजली धारु, त्यांची कन्या शर्वरी धारु व संपदा जोशी या विशेषत्वे उपस्थित होत्या. शोकसभेच्या शेवटी अंजली धारु यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वर गायकवाड आणि जळगाव शहराचे असलेले अतूट ऋणानुबंध भावूकपणे उपस्थितांसमोर मांडले.

    शोकसभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा योगेश शुक्ल,  ज्येष्ठ रंगकर्मी ओमप्रकाश शर्मा, चिंतामण पाटील, सौ. प्रतिमा धर्माधिकारी याज्ञिक, राजेंद्र देशमुख, शंभू पाटील, पवन खंबायत, हर्षल पाटील, नाशिक येथील रंगकर्मी संदीप पाचंगे या सर्व रंगकर्मींनी आपल्या मनोगतातून गायकवाड यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    शोकसभेचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. या सभेला बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शहरातील कलावंत, नाट्य रसिक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मोठा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या रंगकर्मीला निरोप दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif