gift card with purchase of ipad target 4 month old baby boy gift nine lives cat food coupons 2015 design your own gift tags uk skylon tower coupon buffet
Monday, December 5, 2022

हृदयद्रावक; पिता पुत्रांनी एकमेकांच्या मिठीतच सोडले प्राण…

- Advertisement -

 

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथे पिता पुत्राचा करून अंत झाल्याची घटना घडली आहे. पिता पुत्र दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा पवार व लालसिंग पवार असे मृतांचे नाव आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होते.

वडगाव (मुलाणे), ता. पाचोरा येथील शेती काम करणारे लालसिंग पंडित पवार (४२) त्यांचा आठवीत शिकणारा एकुलता एक मुलगा कृष्णा लालसिंग पवार(१३) हे पिता पुत्र दिघी कपाशी वेचून घरी परतत असतांना, कृष्णा याचा नदी किनाऱ्यावरून पाय घसरल्याने तो नदीत जाऊन पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचे वडील लालसिंग यांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकली. मात्र, त्यांना देखील पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. ते मुलापर्यंत पोहोचले आणि मुलाने वडिलांना मिठी मारली. त्यांच्या पुतण्याने ही बाब घराकडे धाव घेत सदर घटना आजोबांना सांगितली. लालसिंग याचे वडील पंडित पवार यांनी त्याठिकाणी येत नदीत उडी मारली, तोपर्यंत वडगाव येथील शेतकरी जयसिंग पवार यांनी पिता पुत्रास बाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यातच घट्ट मिठी मारत अखेरचा श्वास घेतला. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पिता पुत्रास चाळीसगाव येथे हलविण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दि २५ रोजी सकाळी एकच वेळी पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळी वडील व एकुलत्या एक भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच बहिणीने एकच आक्रोश केला. बहिणीचा आक्रोश एवढा होता की, ती प्रेत पुढे जाऊ देण्यास तयार नव्हती.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या