उन्हाळ्यात खा भरपूर काकड्या ! होतील जबरदस्त फायदे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा प्रचंड तडाखा बसत आहे. यामुळे लोकं वैतागले असून उष्माघातामुळे राज्यात आतापर्यंत चार बाली गेले आहेत. म्हणून सर्वानी उन्हाच्या चटक्यापासून बचाव करायला पाहिजे. यासाठी आपल्या आहारविहाराकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून उन्हाळ्यात पौष्टिक थंड पदार्थ खायला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराचे तापमान योग्य राहील.

सध्या बाजारपेठेत काकडी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हाडे मजबूत करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात काकडीची विशेष भूमिका आहे. काकडी खाण्याचे विविध फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासते. पुन्हा पुन्हा थंड पाणी प्यावेसे वाटते. शरीरात पाण्याची कमतरता असल्याने डिहायड्रेशन, पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा समस्या निर्माण होतात. काकडीत ९० टक्के पाणी असते. शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी आहारात काकडीचा समावेश करू शकता.

ऊर्जा मिळते

उन्हाळ्यात प्रचंड थकवा येतो. त्यामुळे उर्जेची कमतरता जाणवते. म्हणून आहारात काकडीचा समावेश केल्याने अॅंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास तसेच शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतात.

हाडे मजबूत

बदलत्या जीवनशैलीत हाडे दुखण्याची तक्रार सामान्य झाली आहे. तुम्हालाही हाडे दुखण्याची तक्रार असेल तर उन्हाळ्यात भरपूर काकडी खा. काकडी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही काकडी अतिशय खास आणि उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते आणि त्वचा चमकदार होते.

बद्धकोष्ठतेमध्ये देखील उपयुक्त

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही काकडी खूप फायदेशीर आहे. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर यावेळी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा.

रक्तदाब राहील नियंत्रणात

ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यातही काकडी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे काकडीचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासोबतच किडनीच्या समस्यांवरही काकडी उपयुक्त आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा. काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. काकडी खाल्ल्याने शरीरातील यूरिक ऍसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धी दूर होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.