Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मैत्रिणीला फोन केला म्हणून तो जाब विचारायला गेला अन…
    गुन्हे वार्ता

    मैत्रिणीला फोन केला म्हणून तो जाब विचारायला गेला अन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    धरणगाव येथे मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्याच्या राग येऊन एकाला तिघांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. घटनेत तीन जणांनी एका तरुणाला लाकडी काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १३ जून रोजी सायंकाळी घडली होती, याबाबत मंगळवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    धरणगाव येथे पांडुरंग रवींद्र सोनवणे (वय २७, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून, शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतो. संशयित आरोपी विकी पवार याने पांडुरंग सोनवणे यांच्या मैत्रिणीला फोन केला होता. याचा जाब विचारण्यासाठी पांडुरंगने विकीला बोलावून घेतले होते. १३ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता विकी पवार त्याच्यासोबत नरेंद्र फुलपगार आणि अक्षय महाजन (तिघे रा. धरणगाव) हे धरणगाव रेल्वे स्थानकाजवळ आले. त्यांनी पांडुरंग सोनवणे याला लाकडी काठी, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात पांडुरंग गंभीर जखमी झाला.

    या मारहाणीच्या घटनेसंदर्भात मंगळवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे विकी पवार, नरेंद्र फुलपगार, अक्षय महाजन या तिघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.

    #crime #fight Call Crime Dharangaon Dharangaon Seriously Injured
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif