Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»सैराट : ‘त्याचा’ खून प्रेमविवाह केल्याच्या रागातून..
    गुन्हे वार्ता

    सैराट : ‘त्याचा’ खून प्रेमविवाह केल्याच्या रागातून..

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 20, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगावच्या हुडको परिसरात सैराट चित्रपटा सारखीच हादरवणारी घटना घडली. तेथे सासरच्या लोकांना आपल्याच लेकीच्या कपाळाचं कुंकू पुसत जावयाचा निर्घृण खून केला. आपल्या घरातील मुलीशी 5 वर्षांपूरवी केलेल्या लव्ह मॅरेजचा सूड उगवत कुटुंबियांनी तरूणाची हत्या केली. कोयत्याने वार करून त्याला संपवण्यात आलं. जळगावच्या पिंप्राळा हुडको येथे प्रेमविवाह केलेल्या 26 वर्षीय तरुणासह त्यांच्या कुटंबावर जुन्या वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून त्यामुळे अख्खं शहर हादरलं आहे. या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मयत तरूणांच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मुकेश रमेश शिरसाठ असे मृत तरूणाचे नाव असून या निर्घृण हत्याकांडामुळे अख्ख्या शहरात खळबळ माजली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ‘सैराट’ सारखी घटना घडली आहे. मुकेश रमेश शिरसाठ याने जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा या तरूणीशी पळून जाऊन लग्न केलं. त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं, यामुळे त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते, अजूनही ते वाद कायम होते. या वादाचे पर्यवसान रविवारी थेट हाणामारीत झाले. रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडला, तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर कोयता व चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला.

    मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण मध्ये आले, मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केल्याने तेही जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

    या हत्याकांडाने अख्ख जळगाव हादरलं असून परिसरांत मोठा तणाव आहे. मुकेशच्या निर्घृण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे. या घटनेमध्ये मयत तरुणाच्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांच्या वतीने आज आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त तैनात केला असून अजूनही तणाव आहे. याप्रकरणी 10 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #murder HUDCO jalgaon Love Marriage Mukesh Shirsath Ramanandnagar Police Station Sairat
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif