Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शौचास जातो सांगून निघाला अन् रस्त्याच्या कडेला दिसला मृतावस्थेत
    गुन्हे वार्ता

    शौचास जातो सांगून निघाला अन् रस्त्याच्या कडेला दिसला मृतावस्थेत

    लोहारा-नाचनखेडा रस्त्यावर आढळला बिगारी मजुराचा मृतदेह
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2026Updated:August 30, 2026No Comments331 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोहारा ता. पाचोरा

    तालुक्यातील लोहारा-नाचनखेडा रस्त्याच्या कडेला एका बिगारी मजुराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गजानन जयराम जाधव (वय ५०) असे मृत मजुराचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

    लोहारा येथील मगरे नामक ग्रामस्थाच्या घराचे बांधकाम सुरू असून, या कामासाठी पिंपळगाव हरेश्वर येथून एक मिस्त्री व दोन बिगारी मजूर आले होते. शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गजानन जाधव यांनी सोबतच्या दोघांना “शौच करून येतो” असे सांगून तेथून निघून गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोनला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दोघेही घरी परतले.

    दरम्यान, लोहारा-नाचनखेडा रस्त्यावर घराकडे बैलगाडीने परतणाऱ्या भाबळा व तोतरा नामक मुलांना रस्त्याच्या कडेला गजानन जाधव हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल तात्याबा नागरे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भिलखेडे व पोलीस कॉन्स्टेबल गोविंद वाळले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

    मृतदेहाजवळ बिगारी कामासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची पाटी तसेच रेती, सिमेंट मिश्रित बांधकाम साहित्य आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

    शौचास जाण्याचे सांगून निघालेला मजूर तब्बल दोन किलोमीटर अंतरावर कसा पोहोचला? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. आज साप्ताहिक बाजार असल्याने मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. मयत गजानन जाधव यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif