Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    • देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»रेल्वेतून पडला.. जखमी झाला.. रुग्णालयात भरती केले मात्र..
    अपघात

    रेल्वेतून पडला.. जखमी झाला.. रुग्णालयात भरती केले मात्र..

    तिथूनही पळाला.. अखेर मृत्यूने पाठलाग सोडलाच नाही.. 
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 5, 2026No Comments527 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भुसावळ रेल्वे स्थानकावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो तेथून कोणालाही न सांगता निघून गेला. काही तासांनी पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नियतीनेही त्याचा पाठलाग सोडला नाही. उपचारादरम्यान त्याचा काही तासातच मृत्यू झाला.

    मृत तरुणाचे नाव मनोज झा (32, रा. जरंगलोई, जि. सुंदरगड, ओडिशा) असे आहे. कामानिमित्त गोवा येथे गेलेले मनोज आणि त्याचा भाऊ सुरेन झा हे दोन ऑगस्ट रोजी रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जात होते. प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर मनोज पाणी घेण्यासाठी खाली उतरला. यावेळी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तो खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

    घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास मनोज कोणालाही काही न सांगता तेथून निघून गेला. जखमी अवस्थेतील रुग्ण अचानक बेपत्ता झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

    दरम्यान, रात्रीच्या वेळी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात तो आढळून आला. 108 रुग्णवाहिका चालकाने तत्काळ त्याला पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला.

    अपघातानंतर मनोजसोबत असलेला त्याचा भाऊ सुरेन झा रेल्वेने पुढे नागपूरपर्यंत गेला होता. मात्र, भाऊ सोबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो पुन्हा भुसावळला परतला. आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही मनोजचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याने ही माहिती ओडिशातील नातेवाईकांना कळवली. त्यानंतर नातेवाईक जळगाव येथे दाखल झाले. तोपर्यंत मृतदेहाची रुग्णालयात अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृत व्यक्ती मनोज झा असल्याचे स्पष्ट झाले.

    पोलिसांकडून पुढील तपास सुरू

    या घटनेची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार ओमप्रकाश सोनी करीत आहेत. रेल्वे अपघात, रुग्णाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून बाहेर पडण्यामागील कारण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif