HDFC च्या ग्राहकांना बसणार मोठा फटका !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

HDFC च्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.  देशातील सर्वात मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन कडून आपल्या होम लोनवरील व्याजदरात वाढ केली गेली आहे. यामुळे आता ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे.

HDFC ने शनिवारी आपल्या रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) मध्ये वाढ केली. RPLR हा बेंचमार्क लोन रेट असतो ज्याला किमान व्याजदर असे देखील म्हणता येईल. HDFC ने आता त्यामध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.

HDFC कडून शनिवारी शेअर बाजाराला ता व्याजदरवाढीची माहिती देण्यात आली. आता 1 ऑगस्टपासून हे नवीन दर लागू करण्यात येतील. या दर वाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. कारण यानंतर लोन वरील EMI मध्ये देखील वाढ होईल. ज्यामुळे ग्राहकांच्या महिन्याचे आर्थिक गणित बिघडेल.

एचडीएफसीने सांगितले की, “एचडीएफसीने घरांच्या कर्जावरील रिटेल मुख्य कर्जदरात वाढ केली आहे. हा असा दर आहे ज्यावर एडजस्टेबल रेट होम लोन्स (ARHL) बेंचमार्क केले जातात. यामध्ये 25 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.25 टक्क्यांनी दर वाढ करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन दर लागू होतील.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.