पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी पुण्यात सिंहगड रोडवर कालीचरण महाराज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवजयंतीनिमित्त आयोजित भाषणावेळी कालीचरण महाराजांनी भडकाऊ भाषण केले होते. याप्रकरणी पाच महिन्यांनंतर आज पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. कायम वादाच्या भोवऱ्यात असलेले धार्मिक गुरु कालीचरण महाराजांच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे.
शिवजयंती निमित्त 11 मार्च रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनसिटी रोड जवळ “हिंदू जनजागरण सभा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी भाषण केले होते. या भाषणात जात, धर्म, भाषा आणि प्रादेशिक गट यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्माच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप कालीचरण महाराजांवर आहे. नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे आयोजित जनआक्रोश मोर्चात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला. कार्यक्रमानंतर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.