‘काळांचा ज्ञाता व शासनकर्ता हृदयस्थ ईश्वर’

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तुटेना फुटेना कदा देवराणा।

चळेना ढळे ना कदा दैन्यवाणा।

जया मानिला देव तो पूजीताहे।

परि देव शोधोनी कोणी न पाहे॥

जगी पाहता देव कोट्यानुकोटी।

जया मानली भक्ती जे तेची मोठी।१७८॥

 

तिन्ही लोक जेथुनी निर्माण झाले।

तया देवरायासी कोणी न बोले।

जगी थोरला देव तो चोरलासे,

गुरुविण तो सर्वथा ही न दिसे॥१७९॥

(समर्थ रामदास स्वामी मनाचे श्लोक)

 

सर्वे वेदाः यत्पदमामनन्ति, तपांसि सर्वाणि च यद् वदन्ति।

यदिच्छन्तो ब्रम्हचर्यं चरन्ति, तत्ते पदं संग्रहेण ब्रवीम्योमित्येतत्॥

कठोपनिषद-१-२-१५॥

सर्व वेद ज्याचे प्रतिपादन करतात, ज्याचे साठी तपश्चर्यादि साधने करतात, ब्रम्हचर्य इत्यादि व्रतांचे पालन करतात, ते पद थोडक्यात सांगतो. त्याचे नाव ॐ असे आहे.

एतध्द्येवाक्षरं ब्रम्ह एतध्द्येवाक्सरं परम्।

एतध्द्येवाक्षरं ज्ञात्वा, यो यदिच्छति तस्य तत्॥

कठो-१-२-१६॥

हेच अक्षर ब्रम्ह आहे. हेच सर्वश्रेष्ठ ब्रम्ह आहे. या ब्रम्हाला जाणल्याने ज्याची जी ईच्छा असेल ती पूर्ण होते. (यमराज-नचिकेता संवाद)

ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या।

जय जयाजी स्वसंवेद्या। आत्मरुपा॥

ज्ञानेश्वरी॥१-१॥

 

नामा म्हणे नाम ओंकाराचे चे बीज।

ब्रम्ह ते केवळ विटेवरी॥१॥

अपाणिपादो जवनो ग्रहिता,

पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः।

स वेत्ति वेद्यं न तस्यास्ति वेत्ता।

तमाहुरग्र् यं पुरुषं महान्तम्॥

श्वेता ३-१९॥

जवनो-दूरगामी, वेगवान, ग्रहिता-गहण करणारा॥

बिनु पद चलई सुनई बिनु काना।

करबिनु करम करई विधी नाना॥

तुलसीदास॥

परमेश्वराला हात नाहीत परंतु तो जगत उत्पत्ती चे मोठे कार्य करतो. त्याला पाय नाहीत पण त्याची गती अनंत आहे. परमेश्वराला डोळे नाहीत पण तो सर्व काही पाहू शकतो. तो सर्वांना जाणतो, पण त्याला जाणणारा कोणीच नाही.

न तस्य कार्यं करणं च विद्यते।

न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते॥

पराऽस्य शक्तिर्विविधै श्रूयते

स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच

॥श्वेता-६-८॥

न तस्य कश्चित्पतिरस्ति लोके,

न चेशिता, नैव च तस्य लिंगं ॥

स कारणं करणधिपाधिपो,

न चास्य कश्चिज्जनिता न चाधिपः

॥ श्वेता-६-९॥

ईश्वरासारखा सुध्दा कोणी नाही, तर मोठा कोण असेल? ईश्वराचा कोणीही पालक, शासक, पिता नाही. ईश्वरच सर्वांचा पिता, पालक, शासक आहे.

अशब्दमस्पर्शमरुपमव्ययं,

तथारसं नित्यमगन्धवच्च यत्।

अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवं,

निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते

॥ कठो-१-३-१५॥

आपल्याकडे कोणत्याही सुखांचा किंवा जगातील कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी फक्त ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, मन एवढेच साधन आहे. यांचे अंतर्गत जे येईल त्याचेच ज्ञान आपल्याला होते. परंतु, ईश्वर हा शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांच्या पलिकडे आहे त्यामुळे आपण आपल्या सामान्य इंद्रियांनी ईश्वराला पाहू शकत नाही, व जाणू शकत नाही.

अंगुष्ठमात्र: पुरुषो ज्योतिरिवाधूमक:।

ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उ श्व:॥कठो।२।१।१३॥

प्रत्येकाच्या हृदयात अंगठ्या एवढी सूर्यासारखी प्रकाशमान ज्योत असते. या ज्योतीला धूर नसतो व ऊष्णता ही नसते. हाच वर्तमान, भूत, भविष्य कालांचा ज्ञाता व शासनकर्ता हृदयस्थ ईश्वर आहे. सनत्कुमारांनी नारदाला केलेला ऊपदेश-

“यो वै भूमा तत्सुखम्। न अल्पे सुखमस्ति।

यत्र न अन्यत्पश्यति, न अन्यत् श्रुणोति,

न अन्यत् विजानाति, स भूमा।

अथ यत्र अन्यत् पश्यति, अन्यत् श्रुणोति,

अन्यत् विजानाति, तत् अल्पम्।

यो वै भूमा तत् अमृतम्।

अथ यत् अल्पम्, तत् मर्त्यम्॥

छांदोग्य उपनिषद॥

“पाद: अस्य विश्वा भूतानि,

त्रिपाद अस्य अमृतं दिवि॥

 

क्रमशः

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२
Leave A Reply

Your email address will not be published.