Thursday, May 19, 2022

हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे मुस्लिम समाजातर्फे स्वागत

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

हनुमान जयंतीनिमित्त येथील वाडी दरवाजातून हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला दि. १६ एप्रिल रोजी सुरुवात झाली. सदर मिरवणूक मुस्लीम वस्तीत आल्यानंतर नमाज चालू असल्याकारणाने रुपलाल चौकात थांबवण्यात आली होती. नमाज पठणानंतर मिरवणुकीतील पदाधिकारी, नुरानी मस्जिदचे मौलाना व इतर प्रतिष्ठित नागरिक यांची भेट घेतली असता नुरानी मज्जित समोर आलेल्या मिरवणुकीचे मुस्लिम समाजातील नागरिकांनी मिरवणुकीतील पदाधिकारी शंकर बारी, शंकर जाधव, सागर पाटील, विक्रम माळी, सिद्धेश्वर पाटील, अनिल भारी, बजरंग पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

- Advertisement -

या स्वागतानंतर सलोख्याच्या वातावरणात मिरवणूक शांततेत पुढे गेली. प्रथमच मज्जित समोर मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्याने जातीय सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा भरत काकडे व पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या