जुन्या वादातून नांद्रा गावात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
जळगाव ;- नांद्रा बुद्रुक या गावात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटनाला घडली असून या घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आला आहे.
यात दंगल घडवल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.ही घटना सोमवारी घडली. तुळसाबाई बळीराम बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी चंद्रभान किटकुल सोनवणे, रवींद्र चंद्रभान सोनवणे, कोकिळा सोनवणे, मंगला सोनवणे, शोभा सोनवणे आणि रत्ना सोनवणे यांनी जुन्या वादाच्या कारणावरून तुळसाबाई यांना शिवीगाळकरून हाताने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, पोलिस हवालदार अभिषेक सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे.या घटनेत दोन्ही गटातील संशयितांनी एकमेकांवर हल्ला करून गावातील शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
यात तुळसाबाई बाविस्कर, वैशाली बाविस्कर, लता बाविस्कर, कविता बाविस्कर आणि संगीता बाविस्कर यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संजय भालेराव करत आहेत.