जळगावात दोन गटांत शस्त्रांसह बेदम हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे
जळगाव प्रतिनिधी

दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना शहरातील वाल्मिक नगर बगीचाजवळ मंगळवारी (११ मार्च) रात्री ११ वाजता घडली. यामध्ये धारदार शस्त्रांचा वापर करून एकमेकांवर हल्ले करण्यात आले, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आला आहे.
सूत्रांची दिलेल्या माहिती अशी कि, योगेश ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३१, रा. वाल्मिक नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री बगीचाजवळ उभा असताना, जुन्या वादातून त्याच परिसरातील ज्ञानेश्वर उर्फ बाळू प्रल्हाद रायसिंगे , रोहित ज्ञानेश्वर रायसिंगे , हेमंत प्रल्हाद रायसिंगे , धीरज ज्ञानेश्वर रायसिंगे ,सागर सुकलाल तायडे (सर्व रा. वाल्मिक नगर, जळगाव) यांनी शिवीगाळ करून त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर, डोक्यावर आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या तक्रारीत ललित हेमंत रायसिंगे (वय ३५, रा. वाल्मिक नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश सोनवणे याने शिवीगाळ करून घरातून तलवार आणून धमकी दिली. त्याचा भाऊ रोहित रायसिंगे समजवण्यासाठी गेला असता, त्यालाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने शनीपेठ पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे नोंदवले असून, अधिक तपास सुरू आहे.


