जळगावात हाणामारी प्रकरणी पाच जणांना अटक

0

जळगाव ;- अंडी फेकण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. एमआयडीसीच्या दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी गुरुवारी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना 23 पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मासूमवाडीत राहणार्‍या जिशांत ऊर्फ दिशू युनूस शिकलीकर याचा बुधवारी वाढदिवस होता. डायमंड हॉलजवळ सर्व मित्र वाढदिवस साजरा करत असताना काहींनी एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरुवात केली. हातात अंडी घेऊन ते एकमेकांच्या मागे पळत असताना ते सम्राट कॉलनी परीसरात पोहोचले. यावेळी गोंधळ उडाल्याने दुसर्‍या समुदायातील लोकांनी आक्षेप घेत पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. याचा राग आल्यामुळे जिशांतसह त्याच्या मित्रांनी थेट लोकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. एमआयडीसीचे कर्मचारी छगन तायडे, किरण पाटील व ललित नारखेडे घटनास्थळी आल्यानंतर तरुणांनी थेट पोलिसांवरच दगडफेक केल्याने तायडे व किरण पाटील जखमी झाले तर दंगलखोरांनी चार वाहनांचीही तोडफोड केली. पोलिसांनी सुमारे 25 जणांवर स्वत: फिर्याद देऊन दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याचा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.