Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»हमासच्या २२०० ठिकाणांवर बॉम्बफेक ; ९०० ठार
    ताज्या बातम्या

    हमासच्या २२०० ठिकाणांवर बॉम्बफेक ; ९०० ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तेल अवीव ;– इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटना यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलने आतापर्यंत हमासच्या 2200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. याशिवाय इस्रायलच्या हवाई दलाने हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद डायफ यांच्या वडिलांचं घरही उद्ध्वस्त केलं. डायफ हा इस्रायलवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 900 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    इस्त्रायली सैन्याने आपल्या भागात 1500 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील हे युद्ध हमासच्या हल्ल्याने सुरू झाले. हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागले. याशिवाय हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले होते आणि त्यांनी नि:शस्त्र इस्रायलींवर क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे.

    इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे 20 लाख लोकसंख्या असलेला गाझाच्या इमारती आता कब्रस्तान बनू लागला आहे. सर्वत्र केवळ ढिगारा आणि धूर दिसत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनच्या 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 260 मुलं आणि 200 महिलांचा समावेश आहे. त्याच वेळी, 4,250 लोक जखमी झाले आहेत. इस्रायलवर हमासच्या धक्कादायक हल्ल्यामागे मोहम्मद डायफ हा मास्टरमाईंड असल्याचं बोललं जात आहे. डायफ हा हमासच्या लष्करी शाखेचा प्रमुख कमांडर आहे.

     

    Dief is the chief commander of Hamas' military wing
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif